माननीय नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून, माननीय श्री मकरंद आबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय श्री संतोषजी पाटील जिल्हाधिकारी सातारा यांचे सुचेनुसार तसेच माननीय श्री योगेशजी खरमाटे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत चाललेल्या महसूल पंधरवड्याने लोकसेवेचा नवा अध्याय लिहिला. गेल्या १५ दिवसांत महाबळेश्वर तालुका महसूल प्रशासनाने गावोगावी पोहोचून गावातील विविध प्रकारचे पांणद , पाय मार्ग गाडी मार्ग रस्ते प्रश्न सोडवणे, त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी रस्ता अदालती , महाराजस्व अभियानातून विमुक्त व भटक्या जातीना व इतरांना दाखले वितरण , शेतकऱ्यांना मार्गदर्शन व पर्यावरण संवर्धन अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
महसूल पंधरवड्याचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. पत्रकार परिषद, ग्रामसभा व सोशल मिडियाच्या माध्यमांचा उपयोग करून नागरिकांपर्यंत योजना, शासकीय सेवा व उपक्रमांचे संदेश प्रभावीपणे पोहोचवले गेले. पोलीस पाटील, कोतवाल, रेशन दुकानदार आणि कार्यालय प्रमुख यांचा सहभाग कार्यक्रमाला बळकटी देणारा ठरला.
दि ८ संप्टेबर ते १२ या कालावधीत तालुक्याया प्रत्येक गावोगावी शिवार फेरी काढून नकाशावर असलेल्या व नसलेल्या शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या नोंदी देऊन रस्त्यांविषयी समस्या प्रत्यक्ष पाहून शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. यामुळे स्थानिक अडचणी त्वरित समजून घेता आल्या आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या.
दि १७ सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभांमधून महसूल पंधरवड्याचे उपक्रम समजावून सांगितले गेले.गावातील असलेल्या रस्त्यांचे वाचन करण्यात आले महाबळेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, शासकीय योजना समजून घेतल्या आणि प्रशासनाशी संवाद साधला, ज्यामुळे सहभाग आणि पारदर्शकतेचा अनुभव वाढला.
ई-चावडी वाचनाद्वारे गावोगावी नागरिकांना जमिनी आणि महसुलाची माहिती थेट सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली गेली. गावढोशी, माचुतर, मोलेश्वर, पारुत, रेले, शिंदी, भोसे आणि इतर अनेक गावांमध्ये हा उपक्रम पारदर्शकता आणि जनविश्वास वाढवणारा ठरला.
दि २२ ते २५ या कालावधीत रस्त्यांच्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रस्ता अदालत आयोजित करण्यात आली आणि जागेवरच तडजोडीने वाद मिटवण्यात आले यामध्ये अवकाळी, हरचंदी, , मेटतळे , मांघर , राजपुरी, अकल्पे आणि इतर गावांमध्ये अडथळे दूर करून रस्ते मोकळे करण्यात आले. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ झाली.
दि १७ ते २२ संप्टेबर दरम्यान पाणंद रस्त्यांवर शिवार फेरी आणि पाहणी करून अतिक्रमण दूर करण्याचे काम करण्यात आले. गुरेघर, कसवंड, लाखवाड, मोलेश्वर, निवळी, राजपुरी, तापोळा आणि इतर गावांमध्ये रस्ते उघडे करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांपर्यंत सहज पोहोचण्याची सुविधा मिळाली.
विमुक्त व भटक्या जातींसाठी आयोजित शिबिरांमधून नागरिकांना रहिवासी दाखले, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले आणि रेशन कार्ड थेट प्रदान करण्यात आले. यामुळे सरकारी सेवा लाभार्थ्यांपर्यंत जलद व प्रभावीपणे पोहोचली.
महाराजस्व अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले गेले. प्रशासनाने गावोगावी जाऊन पोटखराब क्षेत्र प्रस्ताव, आपले सरकार सेवा केंद्रातील सेवा, गावातील सापडलेल्या कुणबी नोंदी गावोगावी प्रसिद्ध केल्या आणि पीएम जनमन योजनेसाठी कातकरी लोकांना जागा देण्याचे प्रस्ताव यासारख्या महत्वाच्या कामांचे यशस्वी आयोजन केले. या मोहिमेमुळे लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती आणि सुविधा थेट मिळाली.
पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत सेवा पंधरवडयात १३७५ झाडांचे संपुर्ण तालुक्यात नागरिकांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत देशी व स्थानिक झाडांची लागवड केली गेली, ज्यामुळे हिरवाई वाढली आणि पर्यावरण जागरूकता रुजली.
या महसूल पंधरवड्यामध्ये नाविन्य पुर्ण उपक्रमांतर्गत क्यु आर कोडच्या माध्यामातून रेशन दुकानदार व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या सेवा विषयी माहिती घर बसल्या उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रशासनावर नागरिकांचा विश्वास दृढ झाला, सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचल्या, तसेच लाभ मिळविण्याचा मार्ग सुकर झाला. विविध उपक्रमांनी दाखले व सेवा पुरविल्या, तसेच गावोगावी लोकसहभाग, पारदर्शकता आणि विकासाची नवी दिशा दिली. महसूल प्रशासनाची ही लोकाभिमुख वाटचाल पुढेही अधिक जोमाने सुरू राहील, या महसुल विभाग कटिबध्द आहे.
धन्यवाद.
...अधिक वाचा